News & Updates

News & Updates

समर्थच्या विद्यार्थ्यांना श्यूज, जॉमेट्री बॉक्सचे वाटप

दिनांक : 12-Jan-2026

देशोन्नती वृत्तसंकलन

रामटेक : मुंबई येथील रोटी
फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था शहरातील समर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात देत असते. दरम्यान संस्थेतर्फे फाउंडेशनचे समन्वयक सी. एम. बगेरिया, संजय सरकार, संजय पन्नासे यांनी नुकतीच पुन्हा एकदा समर्थ शाळेला भेट देऊन येथील इसत्ता ६ व ७ च्या विद्यार्थ्यांना श्यूज आणि जॉमेट्री बॉक्सचे वाटप करीत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शालेय उपयोगी वस्तू जाणून घेत लवकरच त्या वस्तू पुरविण्याची हमी दिली

यापूर्वीही
रोटी फाउंडेशनच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास बॉक्स, क्रीडा साहित्य वितरित करण्यात येत आहे. रोटी फाउंडेशनचे संस्थापक पोलिस महासंचालक डी शिवानंद यांच्या माध्यमातून ह साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जंजाळ यांच्यासह शाळेतील सर्व
शिक्षकगण, कर्मचारी तसेच व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघटनेच्या रामटेक शाखेचे अध्यक्ष राजू कापसे, सचिव पंकज बावनकर, सदस्य सुरेंद्र बिरणवार तथा सचिन चौरसिया उपस्थित होते. रोटी फाउंडेशनच्या या सेवाभावी कामाबद्दल शाळा व्यवस्थापनातर्फे संस्थेचे आभार मानले

समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा पर्यावरणपूरक उपक्रम

दिनांक : 19-Jul-2025

२५,००० सीडबॉल, हरित रामटेकचा संकल्प

रामटेक, Environmental Conservation समर्थ हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, रामटेक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सृजनशील उपक्रम राबविला. जीवशास्त्र विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तब्बल २५,००० सीडबॉल तयार करून गड मंदिर ते नागार्जुन मंदिर या सुमारे चार किलोमीटरच्या परिसरात फेकण्यात आले.

समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव व सृष्टी सौंदर्य संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश किंमतकर यांनी विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या प्राचार्या ममता लोखंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रोत्साहन करत त्यांना सहकार्य केले. सीडबॉल प्रोजेक्टच्या Environmental Conservation यशस्वीतेसाठी जीवशास्त्र विभाग प्रमुख नंदेश शेळके, उपप्राचार्य आर. व्ही. गायकवाड प्राध्यापक देशमुख लांजेवार, ढोरे, चव्हाण बालपांडे वांद्रे मेहर काळे कटरे गजभिये यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी कांद्री माईनचे प्रबंधक राजेंद्र मुळक यांनी बसची सोय केली. कार्यक्रमादरम्यान ऋषिकेश किंमतकर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शेंगदाणा चिक्की व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.


या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली. फेकलेले सीडबॉल भविष्यात हिरवळीत रूपांतर होऊन गडमंदिर ते नागार्जुन मंदिर परिसर हरित होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, सीडबॉल कापडी व प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून नेण्यात आले होते व त्यांचा योग्य पुनर्वापर केला गेला. टेकडी परिसर, झाडांना कोणताही त्रास न देता, सर्व उपक्रम निसर्गस्नेही पद्धतीने राबविण्यात आला. Environmental Conservation चॉकलेट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेष्टन शाळेत परत आणून अनुशासनाचे उत्तम उदाहरण घालून दिले. समर्थ विद्यालयातर्फे वेळोवेळी असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात असून, पर्यावरण संतुलनासाठी हे महत्त्वाचे योगदान ठरत आहे.
सौजन्यः सारंग पांडे, संपर्क मित